अधिक माहितीसाठी संपर्क - संजीव साने / cluster.info@gmail.com / ९८६७ ७८९ ७०५

ठाणे क्लस्टर जागरण अभियान

गेली अनेक वर्षे येणार येणार असा हा क्लस्टर प्रकल्प अखेर ठाण्यात आला, एप्रिल-२०१८ मध्ये ठाणे महापालिकेने ठाण्यातील एकूण ४४ ठिकाणी क्लस्टर योजना लागू करण्याची घोषणा केली आणि त्या क्षणापासून ठाणे मतदाता जागरण अभियान ठाण्यात जनजागृती करत आहे, क्लस्टर योजनेतील त्रुटी दाखवून देत आहे. ठाण्यातील नागरी पुनर्निर्माण समूह योजना (Urban Renewal Cluster Scheme) म्हणजे अपुरा अभ्यास, ढिसाळ नियोजन आणि खरी माहिती दडवून ठेवणे

(more…)

क्लस्टर विषयी सर्व काही ... आणि प्रश्नांची उत्तरे

महापालिका अधिकारी व ठाण्यातील नेते क्लस्टर योजनेची माहिती पारदर्शक पद्धतीने देत नाहीत, ती इथे मिळवा, आपल्या मनातील शंका विचार, प्रश्न विचारा

क्लस्टर योजना म्हणजे काय ?

क्लस्टर योजना कशासाठी ? ठाणे शहराच्या बेसुमार वाढीमुळे, अनधिकृत इमारतींच्या प्रचंड संख्येमुळे मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण आहे, या सुविधा पुरविता येत नाहीत, अनेक इमारती धोकादायक असल्याने जीवित व मालमत्ता हानी टाळणे ही निकडीची गरज आहे. शहरातील जंगल-जमीन, खाडी किनारा जमीन वाचविणे, मूलभूत सुविधा पुरविणे आणि प्रभागाचा नियोजनबद्ध विकास यासाठी क्लस्टर योजना आहे. पण

(more…)

ठाणे क्लस्टरमध्ये कोणाला काय मिळणार ?

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ठाण्यातील क्लस्टर योजना राबविताना खालीलप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यानुसार झोपडपट्टी, अनधिकृत चाळी, अनधिकृत इमारती, अधिकृत इमारती मधील सर्व रहिवाशी या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र अशा सर्व भाडेकरूंच्या वास्तव्याचा पुरावा म्हणून ३१ डिसेंबर २०१४ हि तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशा सर्व रहिवाशांकडे महापालिकेची

(more…)

ठाण्यातील क्लस्टर – धोके व त्रुटी

क्लस्टर योजना कशासाठी ? ठाणे शहराच्या बेसुमार वाढीमुळे, अनधिकृत इमारतींच्या प्रचंड संख्येमुळे मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण आहे, या सुविधा पुरविता येत नाहीत, अनेक इमारती धोकादायक असल्याने जीवित व मालमत्ता हानी टाळणे ही निकडीची गरज आहे. शहरातील जंगल-जमीन, खाडी किनारा जमीन वाचविणे, मूलभूत सुविधा पुरविणे आणि प्रभागाचा नियोजनबद्ध विकास यासाठी क्लस्टर योजना आहे. पण

(more…)

क्लस्टरबाबत पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

योग्य व खरी माहिती हवी आहे ? प्रश्न विचारायचा आहे ? मनात शंका आहे ? तर इथे क्लिक करा

माझे घर झोपडपट्टीत आहे, ३०० फुटाचे आहे, वरती माळा केला आहे, २०० फुटाचा, मला किती फुटाचे घर मिळेल ?
झोपडपट्टीत कितीही फुटाचे घर असेल तर प्रत्येक भाडे-पावतीवर प्रत्येकी एक २६९ फुटाचे घर मिळेल. महापालिकेची मालमत्ता कर भाडे-पावती ज्याच्या नावावर त्यालाच हे घर मिळेल

ज्या घरावर एक कर-पावती असताना अधिकचे बांधकाम झाले असेल तर २०१४ पूर्वीच्याच बांधकामाला, तेही वेगळी कर-पावती असेल, त्यालाच घर मिळेल. दोन्ही बांधकामांची पावती एक असेल तर दोन घरे मिळणार नाहीत, एकच घर मिळेल.

आपल्या झोपडीचा एरिया कितीही असेल तरी २६९ फुटाचेच घर मिळेल, त्यापेक्षा मोठे घर हवे असेल तर अधिकच्या बांधकामाचा बांधकाम खर्च बाजारभावाने द्यावा लागेल

आमची सोसायटी authorised आहे आणि दहा वर्षापूर्वी बांधलेली इमारत मजबूत आहे, तरी आम्हाला क्लस्टर compulsory आहे का ?
अजिबात नाही, तुमची सोसायटी अधिकृत असेल व इमारत मजबूत असेल तर तुम्हाला क्लस्टर योजनेत सहभागी होण्याची सक्ती नाही. तुमच्या आजूबाजूच्या सोसायटी, लोकवस्ती यांच्यासाठी क्लस्टर राबविला जाईल, त्या क्षेत्रफळात आपले क्षेत्रफळ धरले जाणार नाही

पण क्लस्टरमध्ये सहभागी झाल्यास आपल्या सोसायटीतील सर्वांना सव्वा पट अधिक क्षेत्रफळाच्या कायम मालकीचे flats मिळतील

(more…)

मालकीचे मोठे घर मिळावे म्हणून स्वयं-पुनर्विकास हाच मार्ग

त्यामुळे सामान्य माणसांच्या भावना लक्षात घेऊन योजनेला विरोध करणे म्हणजे विकासाला आणि कल्याणकारी योजनेला विरोध करणारे म्हणजे विकासाचे आणि जनतेचे विरोधक ही भावना प्रबळ करण्यापेक्षा आपण काय करू शकतो ज्यामुळे लोकांचा फायदा होऊ शकतो यावर विचार होणे गरजेचे आहे आणि डॉ चंद्रशेखर प्रभू सारख्या अनुभवी तज्ञ व्यक्तीने हा सर्वोत्तम मार्ग सुचविला आहे.

(more…)